ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा आरोग्यासाठी लाभदायक- डी.पी.सावंत
नांदेड, दि.2 (प्रतिनिधी)-भारतामध्ये अनेक नैसर्गिक उपचार पध्दती अनादीकालापासून प्रचलित आहेत. नैसर्गिकरित्या उपचार करुन रुग्ण बरे होऊ शकतात. आयुर्वेदाइतकीच ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा महत्त्वपूर्ण असून या चिकित्सेचा आरोग्याला लाभ होऊ शकतो असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी आज येथे केले.
भारताचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसचे माजी नांदेड तालुकाध्यक्ष ॲड.निलेश पावडे मित्रमंडळाच्या पुढाकारातून व राज्यस्थानमधील जोधपूर येथील ॲक्युप्रेशर रिसर्च ॲण्ड ट्रींटमेन्ट संस्थेच्या सौजन्याने मागील काही दिवसांपासून नांदेड शहर व तालुक्यातील विविध भागात ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा साप्ताहिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून आज दि. 2 ऑगस्ट रोजी सहयोगनगर येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी पालकमंत्री डी.पी.सावंत बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी अनेक नैसर्गिक उपचार पध्दतीचे महत्व उपस्थितांना आपल्या भाषणातून सांगितले व या साप्ताहिक शिबिराचा नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड.सुरेंद्र घोडजकर, संयोजक ॲड.निलेश पावडे, नानकसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी नगरसेवक नवल पोकर्णा,बाजार समितीचे संचालक नागोराव आढाव, सत्यजित भोसले, ॲड.अमित डोईफोडे, राजेश बिऱ्हाडे, रमेश कोकरे, अब्दुल गफार, प्रशांत वावधने, आरेफ खान, शिनू परे, विजय बेदरकर यांच्यासह संयोजन समितीतील शहर काँग्रेसचे सचिव नागराज सुलगेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हंसराज काटकांबळे, प्रवीण कुपटीकर, शुभंम वाघमारे,नितेश दुर्गम, सलाऊद्दीन गाझी, रोहन कंधारे, विनायक क्यारमकोंडा, साईराज देशराज, रवि देशराज,राजू साठे, संतोष पवळे, प्रियंद्र वाठोरे यांची उपस्थिती होती.