क्राईम
सायबर पोलीस स्टेशनच्या मधतीने फसवणुक झालेले 35,500 रूपये तक्रारदार यांचे खात्यात परत.
पोलिस ठाणे वजीराबाद येथील दाखल बँक फसवणूक तक्रारी अर्जातील अर्जदार अशिष प्रकाश सोनेकर रा. वजीराबाद नांदेड यांना त्यांचे फेसबुकवर वधु-वर परीचय करून देण्याची जाहीरात आली. जाहीराती मध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर तक्रारदार यांनी संपर्क केला असता, आम्ही ऑनलाईन पध्दतीने वधु-वर परीचय करून देतो असे सांगून तक्रारदार ज्यांना काही मुलीचे फोटो पाठवून व त्यामुलीची व त्यांचे नातेवाईकांची भेट करून देण्यासाठी वेळावेळी 35,500 रुपये ऑनलाईन पध्दतीने घेतले परंतु त्यांना मुलीचे व त्यांच्या नातेवाईकाची भेट करून दिली नाही व भेट करून देण्यास टाळाटाळ करत असल्याने तक्रारदार यांना लक्षात आले की आपल्याला कोणीतरी फसवत आहे.
त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन वजीराबाद व सायबर पोलीस स्टेशन, नांदेड येथे तक्रार दाखल केली सदर तक्रारी वरून सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांच्याकडून घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती घेतली व तात्काळ संबंधित बँका आणि wallet यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधला. त्यावरून संबंधित बँका आणि wallet यांनी तात्काळ कारवाई केली. सदर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित बँकासोबत आणि wallet सोबत वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदार यांना फसवणूक झालेली पुर्ण रक्कम 35,500/- रूपये त्यांच्या खात्यात परत मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी मा. पोलीस अधीक्षक, नांदेड श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांचे आभार मानले. सदरची कार्यावाही मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे व अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन येथील पोउपनि दळवी, पोउपनि थोरवे व पोलिस नाईक विलास राठोड यांनी पार पाडली