जिला
D गँग मधील सक्रीय आरोपीस एक वर्षोंसाठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार
श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी जिल्हयातील अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वजीराबाद हद्दीतील अनेक गुन्हेगारांविरुध्द पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली होती.
सदर कार्यवाहीमध्ये एक हद्दपार प्रकरणांमध्ये विकास माने, उप विभागीय दंडाधिकारी, उप विभाग, नांदेड यांचे कार्यालयाचे मा. उप विभागीय दंडाधिकारी, नांदेड यांचे न्यायालयीन पत्र क्रमांक जा.क्र. 2023/ हद्दपार / एमएजी / सिआर-2/1367 उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय, नांदेड. दिनांक 23.06.2023 अन्वये नांदेड शहरातील डी गँग मधील टोळीचा सक्रीय सदस्य दिपक शंकरराव रापतवार, वय 23 वर्षे रा. भाईगल्ली चिखलवाडी, नांदेड यास एक वर्षे कालावधीसाठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार केले आहे.
सदर हद्दपारीचे आदेश प्राप्त होताच मा. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांचे मार्गदर्शनाखली डी. बी. पथकाचे प्रमुख शिवराज जमदडे सहा. पोलीस निरीक्षक, व डी.बी. पथकाचे अंमलदार पोहेकॉ दत्तराम जाधव, पोना/ विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, पोकॉ/बालाजी कदम, शेख इम्राण, भाऊसाहेब राठोड, रमशे सुर्यवंशी यांनी सदर गुन्हेगारास हद्दपारीची नोटीस तामील करून पुढील हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली.
जनतेला अव्हाण करण्यात येते की, सदर हधीपार ईसम हा नांदेड शहर व नांदेड जिल्हात मिळुन आल्यास खालील संपर्क क्रमांकवर कळविणेस विनंती आहे.
01. पो.स्टे. वजिराबाद कार्यालया नंबर – 02462-2236500
02. मा. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड -9823333377
03. मा. सहा. पोलीस निरीक्षक, शिवराज जी. जमदडे, 9890396652
04. पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 वर संपर्क करावा.
उर्वरीत प्रलंबीत प्रस्तावातील जास्तीत जास्त गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडुन करण्यात येत आहेत