श्रीमती नीती सरकार, डीआरएम, नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याचे समुपदेशन केले
भारतीय रेल्वे सुरक्षेला अत्यंत महत्त्व देते. या उद्देशाच्या अनुषंगाने श्रीमती. नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर एक सुरक्षा सेमिनार आयोजित केला होता ज्यात नांदेड स्थानकावरील सर्व रेल्वे पुरुष आणि महिला कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती. सरकार यांनी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा पद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. श्रीमती. सरकार यांनी कर्मचार्यांाना वैयक्तिकरित्या सुरक्षेबाबत समुपदेशन केले आणि प्रतक्ष काम करताना उद्भवणार्याी परिस्थितीचे लक्षपूर्वक श्रवण केले, तसेच त्यावर उपायही सुचविले. यामुळे कर्मचार्यांभचे मनोबल मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि उपस्थित व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास खूप मदत झाली आहे.
श्री वामशी कृष्णा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, श्री एम. बसवराज, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, श्री परम मित्र, विभागीय यांत्रिक अभियंता, श्री विनोद साठे, सहाय्यक विभागीय यांत्रिक अभियंता, सुरक्षा पर्यवेक्षक, सिग्नल आणि दूरसंचार, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इंजिनीअरिंग विभाग चे कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.