जिला

नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 15,49,000/- रूपयाचे 102 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत सायबर पोलीस स्टेशनची कार्यवाही

 

नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोउपनि जी. बी. दळवी यांना आदेशीत केले होते. पो.स्टे. सायबर यांनी त्यानूसार सायबर सेलचे एक पथक व नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.
नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 102 मोबाईल किंमत 15,49,000/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यापैकी आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते 45 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहेत. उर्वरीत मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page व Twitter वर आहेत. आले आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन सायबर पो.स्टे. यांनी केले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, नांदेड डॉ. श्री खंडेराय धरणे, भोकर. गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पो. नि. श्री चिखलीकर स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.स्टे सायबर पोउपनि जी. बी. दळवी, सोपान थोरवे, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, विलास राठोड, रेशमा पठाण, अनिता नलगोंडे, दाविद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जैस्वाल, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिद्धेवार यांनी पार पाडली.
सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button