अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेड मार्गे ओखा-मदुराई-ओखा विशेष गाडीच्या चार फेऱ्या
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून पश्चिम रेल्वे ने ओखा-मदुराई-ओखा दरम्यान विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे . हि गाडी चार फेऱ्या पूर्ण करेल. हि गाडी अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड मार्गे धावेल. ती पुढील प्रमाणे :
1. गाडी क्र. 09520 ओखा ते मदुराई विशेष गाडी : हि विशेष गाडी ओखा येथून दिनांक 10, 17, 24 आणि 31 जुलै ला सोमवारी रात्री 22.00 वाजता सुटेल. हि गाडी द्वारका, राजकोट, अहेमदाबाद, बरोडा, सुरात, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड, काचीगुडा, कर्नुल, रेणीगुंठा, काटपाढी, मार्गे मदुराई येथे गुरुवारी सकाळी 11.45 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्र. 09519 मदुराई ते ओखा विशेष गाडी : हि विशेष गाडी मदुराई येथून दिनांक 14, 21, 28 जुलै आणि 04 ऑगस्ट, 2023 ला शुक्रवारी रात्री 01.25 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच ओखा येथे रविवारी सकाळी 10.20 वाजता पोहोचेल.
या गाडी ला द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, स्लीपर क्लास आणि जनरल असे 21 डब्बे असतील.