गारपीटीच्या नुकसानी पासून रोही पिंपळगाव, सरेगाव, नादरी( बोरगाव) व जवळा मुरार गावचे शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित
मुदखेड, (मुदखेड हकीम) दिनांक १६ मार्च रोजी तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने सर्व तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला होता.
या गारपिटीने शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले होते यात केळी, हरभरा, उन्हाळी ज्वारी, असे इतर अनेक पिकांचे नुकसान झाले होते.
शासनामार्फत या झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी तहसील कार्यालयातील प्रत्येक गावच्या तलाठी मार्फत पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते. तलाठी शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करत तलाठ्याने केवळ चेहरे पाहून पंचनामे केले खरेच नुकसान झाले आहेत अशा शेतकऱ्यांचे पंचनामा न करता त्यांना या शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले, ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मध्ये नुकसान झाले त्यांना शासनामार्फत करण्यात आलेले आर्थिक मदत मिळाले नाही, त्याकरिता रोही पिंपळगाव, सरेगाव, बोरगाव नादरी, व जवळा मुरार, येथील शेतकऱ्यांची मुदखेड तहसील कार्यालयाला धडक.
मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळाले नसून ते कधी मिळणार यासाठी मुदखेड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
रोही पिंपळगाव चे तलाठी असोले यांनी येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या यादीत नाव टाकण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागत आहेत असे शेतकऱ्याकडून समजते हे कितपत सत्य आहे हे संशोधनाचा विषय आहे.
गारपीट नुकसान पासून वंचित असलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हा प्रश्न मात्र न सुटणारे कोडं आहे.