क्राईम

पो.स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाची जम्बो कार्यवाही चार गुन्हयात १० आरोपी अटक आरोपीकडुन तिन संजर एक गावटी पिस्टल, एक मोबाईल जप्त

दिनांक २९/०६/ २०२३ रोजी सकाळ पासुन बकरी ईद सणानिमीत्य पोलीस निरीक्षक श्री मोहन भोसले यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेकरीता पोलीस स्टेशन शिवाजीनगर सकाळ ०६.०० वाजता पासुन हददीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करत असतांना फिर्यादी नामे सिध्द्धात ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्ष व्यवसाय शिक्षण आरसीसी क्लासेस, टिळकनगर नदिड यास तिन अज्ञात इसमांनी खंजर लावुन खंडणी मागुन मारहाण केली व त्याच मोबाईल व नगदी २००० रूपये काढुन घेतल्याने गु.र.न २०२/२३ कलम ३९४,३८४, ५०६, ३४ भादंवि व ४/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने तात्काळ सदर आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे १ लयख शेख इस्माईल वय १९ रा. कंधार, ०२. साहिल विजय उर्फ पंजाब राठोड वय १९ रा. भावसारचौक नांदेड, ०३ प्रशिक मिलींद केळकर वय १९, रा. लेबरकॉलनी यांना अटक करून त्यांचेकडील मोबाईल व खंजर नगदी २०००/- जप्त केले. तसेच गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी जयकुमार उर्फ सोनू पि. कैलास राउत वय २२ वर्ष व्यवसाय शिक्षण बुलेट शोरूमचे बाजुला, सन्ना कॉलनीचे बाजुला रा. सुमेघनगर, नांदेड यास बाबानगर येथून ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी पिस्टल किमत २२,०००/- ची जप्त करून गु.र.न २०५ / २३ कलम ३/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे अधिकची गोपनिय माहितीचे आधारे जुने फायर स्टेशन जवळुन तिन इसम १. चेतन अशोक कांबळे वय २९ वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. आंबेडकरनगर नांदेड, ०२ शिवाराज रंजीत दळवे वय २८ वर्ष व्यवसाय बेकार रा. लक्ष्मी रेसीडंसी कॅनॉल रोड तरोडा, नांदेड, ०३. अंन्शु रावसाहेब कांबळे वय १९ वर्ष व्यवसाय बेकार रा.कसबे गुरूजीच्या बाजुला आंबेडकरनगर नांदेड यांचेकडुन एक खंजर जप्त करून गु.र.न २०३ / २३ कलम ४ / २५ आर्म अॅक्ट प्रमाणे व गोकुळनगर पाण्याची टाकीजवळून तिन इसम १ विवेक उर्फ विक्की पि. नरहरी सुर्यवंशी वय १९ वर्ष व्यवसाय बेकार रा. त्रिरत्न बौध्द विहार जवळ आंबेडकरनगर नांदेड, ०२. कुणाल रामसिंग परमार वय २७ वर्ष व्यवसाय बेकार रा. भगतसिंग रोड जुना मोंढा नांदेड, ०३. आकाश मच्छींद्र नवगीरे वय १७ वर्ष व्यवसाय मजुरी रा. आंबेडकरनगर यांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक खंजर जप्त करून गु.र.न २०४ / २३ कलम ४ / २५ आर्म अॅक्ट प्रमाणे असे गुन्हे दाखल करून गुन्हेगाराचे कृत्यावर प्रतिबंध घालून चांगली कामगीरी केली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ. श्री खंडेराव धरणे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री गुरगुरव, पोलीस निरीक्षक मोहन भोसले पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे व अमलदार दिलीप राठोड, शेख इब्राहीम, रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे, विष्णु डफडे यांनी चार्ली पथकातील अमलदार आकाश सावंत, सुरज काकडे, सायवरसेल येथील अमलदार ओढणे, सिटीकर यांचे मदतीने पार पाडली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button