गुरुद्वारा प्रबंधक ठाणसिंग यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रमात सत्कार
नांदेड दि.३० मागील आठवड्यात महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा शासकीय कार्यक्रम नांदेड शहरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा बोर्ड तर्फे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती यामुळे शासनाच्या या कार्यक्रमाला प्रातिनिधिकस्वरूपात गुरुद्वारा प्रबंधक ठाणसिंग यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रभावी नियोजन केले त्यामुळे त्यांचाही सदरील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला
यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजपूत उपस्थित होते