जिला

ज्ञानमाता विद्याविहार हायस्कूलचे शिक्षक श्री. क्लेमेंट अल्लाडा यांची यशस्वीपणे सेवापुर्ती

 

नांदेड दि.३० ज्ञानमाता विद्या विहार हायस्कूलचे शिक्षक श्री. क्लेमेंट अल्लाडा 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 30 जून रोजी त्यांनी आपली यशस्वीपणे सेवापूर्ती केली या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापकांनी क्लेमेंट सरांचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले, त्यांची शिक्षणाविषयीची जिज्ञासा, विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि त्यासाठी काम करण्याची त्यांची तळमळ शाळेला कायम प्रेरणा देत राहील असे गौरव उद्गार मुख्याध्यापक साहेबांनी काढले व त्यांनी आपल्या सेवेत अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले.शाळेतर्फे आयोजित सेवापूर्ती कार्यक्रमात श्री.सर क्लेमेंट बोलत असताना त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

शिक्षण क्षेत्रात नेहमी होत शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन बदलांचा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही स्वीकार केला पाहिजे तरच शिक्षण प्रभावीपणे दिले जाऊ शकते विद्यार्थ्यांसाठी रेमेडीयल वर्ग, ऍसिड वॉश परीक्षा, इंडिजमेंट प्रकल्प असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेचे शिक्षक श्री म.हमीद यांनीही मनोगत व्यक्त करताना क्लेमेंट सरांचा गौरव केला आणि त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.क्लेमेंट यांची सेवा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक फा.अनिल जॉर्ज, उपप्राचार्य फा.जिजो फॅन्सीस, सिस्टर शीला, सिस्टर रोश्मिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवापुर्ती यशस्वी केल्याबद्दल क्लेमेंट अल्लाडा यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button