शिक्षण
डॉ.फर्जाना बेगम यांचे सेट परीक्षेत सुयश
नांदेड दि. २८ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी म्हणजेच ‘सेट’ परीक्षेत डॉ फर्जाना बेगम यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.त्यांनी उर्दू विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट किंवा पीएचडी हे पात्रता असणे आवश्यक आहे. या अगोदर डॉ.फर्जाना बेगम यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी ही पदवी सुद्धा प्राप्त केली आहे.सध्या डॉ.फर्जाना बेगम या देगलूर नाका येथील कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात उर्दू विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे वडील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी मोहम्मद खान,आई तसेच परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.