मराठवाडा

गणीभाईच्या किचनवर राजकीय डोळा ?

 

  
बीड जिल्हा रुग्णालयात नास्ता सह तीन वेळा जेवण देण्याचे शासकीय टेंडर नाशिक येथील संस्थेस असून गेली अनेक वर्षे या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून गणी बागवान सिव्हील मध्ये अन्न रुग्णांसह सोबत असलेल्या नातेवाईकास पुरवतात , मात्र सदरील टेंडर आपणास मिळावे यासाठी सत्तेच्या काही नेत्यांनी सदरील किचन आपणास मिळावे करिता राजकीय कसब पणाला लावले . गणी भाई यांची कर्तव्य दक्षता व तत्पर सेवा मुळे या किचन मध्ये डाळ शिजली नाही . मात्र गणी भाई त्यांच्या आईसह इस्लाम च्या हज या पवित्र यात्रेत पोहोचले आणि मागे खोटी तक्रार देऊन बीडचे काम काढून घेण्याच्या राजकीय हालचाली सुरु झाल्या असल्याचे सूत्र कळवतो आहे .  
 एखादा माणूस कितीही इमाने इतबारे आपली कर्तव्य बजावत असला तरी त्याच्या धर्मावरून त्याच्याशी वागण्याची रीत प्रशासनाची असू शकते हे किती विचित्र आहे . बीड जिल्हा रुग्णालयात असलेल किचन मध्ये आपल्याला काम मिळावे आणि मग आपण त्यात पैसे कमावू यासाठी बीड मधील एक नेता आम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळचे असल्याचे आम्हालाच काम हवे म्हणून दबाव वाढवला जात आहे. आरोग्यमंत्री आणि थेट एकनाथ शिंदे यांच्या कार्यलयात सदरील किचनचे काम मिळवण्यासाठी राजकीय कसब वापरले जात असून ,डॉ साबळे यांच्या मदतीने बोगस तक्रारी देऊन चांगले काम असताना आक्षेप घेतला गेल्याचे कळते आहे.
कुठेही अर्थ पाहणाऱ्या नेत्यांना सिव्हील मध्ये देखील पैसा दिसावा , जिथे राजकीय लोक रुग्णाची सेवा करून आशीर्वाद मिळतात तिथे पैसे कमावण्याची संधी शोधणे केवळ केविलवाणे नाही तर पैसे कमावण्यासाठीचा न्यूनतम स्तर आहे असे लोक चर्चा करत आहेत . गणी भाई ने नेहमीच रूग्णा सह नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांना सेवा दिलेली आहे . आज अनेक संघटना सिव्हील मधील राजकीय हस्तक्षेप विरोधात जिल्हा प्रशासनास आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडणार असल्याचे समजते आहे

गणीभाईच्या पाठीशी अल्लाह आणि देव  
कोरोनाच्या काळात कुणी कुणाला बोलायला तयार नव्हते , सख्खे दूर जात असताना गणी भाई आपल्या घरातून २ महिने बाहेर होते सिव्हील मध्ये झोपून राहिले आणि सर्व धर्मीय लोकांच्या रुग्णांना जेवण दिले . खर तर हा केवळ टेंडर चा विषय नाही मानवता आहे . आज जेव्हा गणी भाई स्वतच्या आईला हज सारख्या पवित्र यात्रेवर असताना त्यांच्या मागे खोट्या तक्रारी देणे कितपत योग्य आहे असा सवाल सामान्य लोकातून समोर येत आहे .

डॉ. साबळे साहेब हे पटते का ?
राजकीय लोकांना जिथे तिथे पैसे कमावण्याची संधी घ्यायची असते मात्र जिथे सेवा होते रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घातली जाते तिथे देखील जर पैसे कमवायचे असतील तर यावर चिंतन झाले पाहिजे . आपल्याकडे तक्रार अनेक येत असतील मात्र आपण त्याची दखल घेऊन थेट मंत्रालयात थोडीच पाठवतो मात्र गणी भाईच्या किचन संदर्भात खोटी तक्रार थेट मुंबईला रवाना करण्यात आपण खर्ची पडल्याची माहिती आहे . अनेक रुग्णाच्या दृष्टीत डॉ साबळे म्हणजे देव आहेत मात्र राजकीय नेत्यांचे बाहुले होऊन कमावलेली इभ्रत डावावर लावण्यात काय अर्थ आहे असे लोकातून बोलले जात आहे .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button