जिला

नांदेड जिल्हाध्यक्षपदी संगमेश्वर लांडगे तर कार्याध्यक्षपदी शेख याहिया

 

नांदेड : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकाराच्या देशव्यापारी संघटनेचे कार्य वेगाने देशातील सर्व राज्यात आणि जिल्हयात पसरत आहे. गुरुवार, 22 जुन रोजी नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली.

शहरातील राजमुद्रा साप्ताहिकाच्या ऑफिस मध्ये एका बैठकीत पत्रकारांनी विचारमंथन करीत व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संगमेश्वर लांडगे यांनी सविस्तर बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी शेख याहिया, जिल्हाउपाध्यक्ष पदी विलास आडे, जिल्हा संघटक पदी प्रभाकर जाधव, जिल्हा संघटक पदी बाळासाहेब देसाई, जिल्हा सहसचिव पदी राहुल साळवे, जिल्हा सदस्य पदी शुभम पांचाळ यांची यांची निवड करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय आणि राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवर भरभराटीला आल्याबद्दल यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी संघटनेने सुरू केलेल्या व्रतात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीनंतर याबाबतची माहिती व्हॉईस ऑफ मीडिया च्या साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीला राष्ट्रीय, प्रदेश, मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गणेश शिंदे, शेख बशीर लाला, शेख अजहर, भारत सूर्यवंशी, गणेश जाधव, चंद्रशेखर लांडगे, डॉ. सुजित येवलीकर, रमेश कदम, कोयल ढवळे यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button