जिला

जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

नांदेड:- जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन दि. २१ जून २०२३ रोजी 
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय परिसर येथे सामुदायिक योग कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा आयुष अधिकारी डॉ संदेश जाधव यांनी अष्टांग योग बद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती सांगून योगा जीवनशैलीत अंगीकार करण्याचे महत्त्व विशद केले तसेच योगाचे फायदे आणि योगाची पूर्वतयारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विविध स्थितीतील आसनांचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करून घेतले आणि शेवटी प्राणायामाचे विविध प्रकार कपालभाती, भस्रिका, भ्रामरी इत्यादी सादर केले. श्रीमती राणी दळवी योगप्रशिक्षक यांनी योग मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अभय अनुरकर,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.संदेश जाधव,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. जव्वादखान, रेणुकादास मैड, श्रीमती कुरुंदकर मॅडम, डॉ उमेश मुंडे, दत्तात्रय सवादे, सत्यजीत टिप्रेसवार, सचिन कोत्ताकोंडवार, राजू दळवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमास 
रुग्णालयातील स्टाफ नर्स,आंतरवसिता डॉक्टर्स, आणि नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी तसेच जिल्हा रुग्णालय येथील अधिकारी, वर्ग ३ व ४ कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button