मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतिने दिनांक १८ ते २८ जून २०२३ दरम्यान मोफत तायक्वादो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल समीती वसतिगृह इमारत येथे सामेकाळी ५.३० ते ७ वाजेच्या दरम्यान करण्यात आले असून शहरातील इच्छुकांनी या शिबीराच लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे.
सदरील शिबीरात स्वसंरक्षणाचे, फिटनेस, स्ट्रेन्थ, कंडीशनीग, स्पर्धापूर्व तयारी बाबतचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड , एन आय एस प्रशिक्षक ओमप्रकाश आळणे हे प्रशिक्षण देणार असून यात सहभागी गरीब व होतकरू पाच तायक्वादो पटूना जिल्हा संघटनेच्या वतिन दत्तक घेणार असल्याचे बालाजी पाटील जोगदंड यांनी सोगीतले. दहा दिवस चालणाऱ्या मा शिबीराचा जास्तीत जास्त नांदेडकरांनी विशेषता महीला व मुलींनी लाभ घेण्याचे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य , संजय चहाण, सुभाष डाकोरे पाटील, अभिजीत ( मुन्ना ) कदम , तायक्वांदो पालक समीतीचे अध्यक्ष राजेद्र सुगावकर संतोष कनकावार, यांनी केले आहे