Uncategorized
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांचा पुढाकार
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून शाहूनगर येथे पावसाळ्यात जाण्या येण्या करीता मोठी कसरत करावी लागत होती आणि रस्त्यावर पाई चालणे देखील मुश्किल झाले होते.अक्षरशः गाड्या मोटार चिखलात फसत होत्या पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. बहुतांश ठिकाणी केवळ रस्ता नाही म्हणून पावसाळ्यात अंत्यविधीला अडचणीला समोर जावे लागत होते. या रस्त्याच्या बाबत आमदार, खासदार व मनपा प्रशासन यांना सतत पाठपुरवठा करण्यात आला होता परंतु कोणत्याही स्तरावर कोणीच दखल घेतली नाही.
या गंभीर बाबीची कैफियत घेउन हा रस्ता करून देण्याची मागणी शाहूनगर येथील रहिवासी यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा शहरअध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्याकडे केली आणि त्यांनी शाहू नगरातील रहिवाशांच्या हाकेला लगेच होकार देऊन दि 15,06,2023 ला कामाला सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांनी स्वखर्चाने सुमारे दोन किलोमीटर लांब रस्त्यावर मलमा टाकून शाहूनगर येथील रहिवाशांसाठी जाण्या येण्याकरिता रस्त्याचे काम करून दिले. त्यामुळे शाहूनगर येथील रहिवाशांचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्याचे काम करून दिल्यामुळे याची कृतज्ञता म्हणून शाहूनगर येथील रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीचे युवाशहरध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांचे स्वागत करून आभार मानले यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, बालाजी पाईकराव, सखाराम उजागरे, मारुती काचगुंडे, राहुल गाडे, राजू जमदाडे, राजू केशवे, सुनिता ताई वावळे, नारायण खिल्लारे, कृष्णा वाघमारे, रितेश वाटुडे, आधी शाहूनगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.