रेल्वे मध्ये 15 अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही, दंड वसूल
दिनांक 12 आणि 13 जून, 2023 रोजी श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली वाणिज्य शाखेतर्फे आदिलाबाद ते मुदखेड सेक्शन मध्ये अनधिकृत फेरी वाल्यांविरोधात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या 15 जणांना रेल्वे सुरक्षा बलाकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यवाहीत त्यांना दंड ठोठाविण्यात आला
यात आदिलाबाद रेल्वे स्थानक तसेच तीन रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. या कार्यवाहीत 15 अनिधिकृत फेरी वाले खाद्य पदार्थांची तसेच पेकेजड ड्रिंकिंग वाटर (पाण्याची बाटली) विक्री करत असतांना आढळले. या 15 जणांना रेल्वे सुरक्षा बलाकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यवाहीत त्यांना दंड ठोठाविण्यात आला. या सर्व 15 जणांना ते अनधिकृत पणे विक्री करत असलेले खाद्य पदार्थ/ पाण्याच्या बाटल्या सह दुसऱ्या रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. त्यांच्याकडून 4140 रुपये दंड वसूल करण्यात आला. आदिलाबाद रेल्वे स्थानकांवर कुणीही अनधिकृत फेरी वाला आढळून आला नाही. तेथील रेल्वे कॅन्टीन मध्ये अधिकृत पाणी बाटली तसेच मान्यता प्राप्त खाद्य पदार्थ योग्य दराने विक्री होत असलेले आढळले.
या तपासणी मोहिमे मध्ये आढळून आले कि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत फेरी वाले पाण्याची बाटली 15 रुपया पेक्षा अधिक किमतीला विकत आहेत. नांदेड रेल्वे विभागातर्फे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते कि आपण पाण्याच्या बाटली करिता फक्त 15 रुपये द्यावे, कुणी ज्यादा आकारणी करत असेल तर रेल्वे विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवावी, या करिता ते फोन क्र. 139 चा आणि रेल मदत (Rail Madad app) एप चा वापर करू शकतात तसेच स्टेशन मास्तर कडे हि तक्रार करू शकतात.
श्रीमती निती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन केले आहे कि त्यांनी अनधिकृत फेरी वाल्यांकडून खाद्य पदार्थ, पाणी किंवा अन्य कुठलेही पदार्थ विकत घेवू नये. नांदेड रेल्वे विभागातर्फे सर्व रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची फुफ्त व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध रेल्वे स्थानकांवर खान-पान ची व्यवस्था करण्यात आली आहे.