जिला

बोंढार येथील अक्षय भालेराव  कुटुंबीयांच्या पाठीशी – डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे

नांदेड  –  जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह घटना आहे. सदरचा खून खटला हा फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणातील दोषीविरुद्ध कडक शासन व्हावे शासनाने सदर कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे अक्षय भालेराव कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्रातील काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे  यांनी केले.
   डॉ.सिद्धार्थ  हत्तीअंबिरे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग यांनी आज बोंढार येथे अक्षय भालेराव कुटुंबाची  भेट घेतली . यावेळी
 काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यासह बोंढार येथे अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रसंगी  अक्षय भालेराव यांच्या मातोश्री व बंधू यांच्याकडे रोख दीड लाख रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम, प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल सावंत, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार राजकुमार एंगडे,श्रीमती अनिताताई इंगोले, नगरसेवक सोनाजीराव सरोदे,सुभाष काटकांबळे ,संजय कोलते, महेंद्र गायकवाड , संजीव कुमार गायकवाड ,गंगाधर सोनकांबळे ,प्रवीण वाघमारे,  जिल्हा संघटक, दिगंबर गायकवाड ,उमरी तालुका अध्यक्ष दिनकर भंडारे, बिलोली माधव वाघमारे, लोह तालुका मधुकर डाकोरे, नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय आईलवर,
हिमायतनगर तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर, जिल्हा सचिव राहुल लोखंडे,जिल्हा सचिव पंडित वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष रामराव सोनसळे, भी.ना.गायकवाड भीम शाहीर आनंद कीर्तने,किशनराव रावणगावकर,संजय वाघमारे,लक्ष्मन अरविंद सरपाते, आनंदराव सावंत, कसले ,आनंद कर्णे,अनिल सरपे दिगंबर माने दिपक पावले बाळू राऊत, एडवोकेट सुनील नागोरे, राष्ट्रपाल खंदारे, सचिन धुतुरे, संजय कांबळे ,आकाश कदम, प्रवीण वाघमारे, कुणाल लोखंडे, कामाजी आटकोरे, नितीन वाठोरे, अमित गिमे मकर ,विकी गायकवाड, उबेद शेख ,राहुल मोरे ,गौतम सोनकांबळे ,यांच्यासह शहर व जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रफुल सावंत  व आभार मुदखेड तालुका अध्यक्ष संजय कोलते यांनी मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button