क्राईम
पोलीस स्टेशन मुखेड हद्दीतील दरोडयाचा गुन्हा उकल करुन एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी
नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणनेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
दिनांक 01/06/2023 रोजी पो.स्टे. मुखेड हद्दीत चांडोळा येथून भगणूरकडे जात असताना फिर्यादीस दोन मोटार सायकलवर पाच इसमांनी येवून फिर्यादीस कट मारुन मोटार सायकल खाली पाडून चाकूचा धाक दाखवून नगदी 2,25,000/- रुपयाची बॅग व एक सॅमसंग कंपनीचा बायोमॅट्रीक टॅब असा एकूण 2,45,500/- रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. त्यावरुन पो.स्टे. मुखेड गुरनं, 171/2023 कलम 394,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पो.स्टे. मुखेड गुरनं. 171/2023 कलम 394,34 भादंवि मधील आरोपी नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्हयामध्ये गुन्हा करुन पळून गेल्याचे माहिती मिळाल्याने सदर आरोपींचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोनि श्री व्दारकादास चिखलीकर, स्थागुशा, नांदेड यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थागुशाचे पोउपनि दत्तात्रय काळे व त्यांचे पथक सदर जिल्हयामध्ये आरोपीतांचा शोध घेवून गुन्हयातील आरोपी नामे सक्षम पि. गौतम ताटे, वय 20 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. संघसेन नगर, नांदेड यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने व त्याचे इतर चार मित्रांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदर आरोपीकडून नगदी ९०००/- रुपये व एक Apple कंपनीचा Phone किंमत अंदाजे 40,000/- रुपये असा एकूण 49000/- रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेले आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. मुखेड येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि दत्तात्रय काळे, पोकॉ/ विलास कदम, गणेश धुमाळ, चापोहेकॉ / अर्जुन शिंदे, पोहेकॉ राजेंद्र सिटीकर, पोहेकॉ दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. सदर गुन्हयातील आरोपी अटक करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील गुन्हे शाखेचे श्री धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पो.नि. श्री संदिप गुरमे व पो.स्टे. वेदांतनगरचे पो. नि. श्री ब्रम्हगिरी यांनी आरोपी अटक करणेकामी सहकार्य केले आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.