मराठवाडा
त्या मयत च्या कुटुंबाला मुंबईच्या गुरुद्वाराकडून आर्थिक मदत
परभणी जिल्ह्यातील उखळद येथील घटनेत सिकलकरी समाजाच्या तीन बालकास बेदम मारहाण करण्यात आली होती ज्या मध्ये क्रीपालसिंग भोंड याचा जागीच मृत्यू झाला होता तर अरुनसिंग टाक, गोरासिंग टाक हे दोघे गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच संदर्भात आज नांदेड येथील गुरुद्वारा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परभणी च्या जिल्हा अधिकारी, व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की उखळद प्रकरणातील आरोपींवर कडक कार्यवाही करावी व हा तपास सीबीआय कडे सोपविण्यात यावा.
निवेदना नंतर सर्व कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयातील दोन्ही युवकांच्या भेटी घेतल्या तसेच
मुंबई येथील सरदार गुरविंदर सिंग बाबा मेंबर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अमृतसर तथा खालसा कॉलेज मुंबई अध्यक्ष यांच्याकडून मयतास दोन लाख रुपये व दोन्ही जखमींना प्रत्येकी एक एक लाख रुपये निधी देण्यासाठी नांदेड येथील सरदार रवींद्र सिंग जी बुनगई (सचखंड गुरुद्वारा बोर्ड नांदेड चे माजी सेक्रेटरी ), ठाकूर सिंग बावरी (शिक शिकलकरी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष ) , राजू सिंग शिलेदार, गुरुदेव सिंग रामगडया , जागीर सिंग बावरी , सतनाम सिंग टाक , रगबीर सिंग टाक , राजू सिंग टाक , बलबीर सिंग जुनी , सुरजित सिंग भोंड , रामलखनसिंग टाक , तुफान सिंग टाक , गोला सिंग टाक , किरण सिंग जुनी , रणजित सिंग टाक आदींनी मयताच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली .