जिला

नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त…..

 

नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी, तीन श्रेणी पोउपनि, नऊ पोलीस अंमलदार हे नियत वयोमानानुसार दिनांक 31.05.2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला. सदर सेवानिवृत्त समारंभ पोलीस अधिक्षक साहेब यांचे कक्षात पार पडला. सर्व सेवानिवृतांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे तसेच आपले पाल्यांना उच्च शिक्षीत करून समाजाच्या सेवेमध्ये आणावे देश सेवेची सेवा करण्याची जिद्द बाळगावी अशा प्रकारचा सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास मा. श्री नामदेव रिट्टे, पोनि पोलीस कल्याण श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, मपोउपनि श्रीमती माया भोसले, पोलीस कल्याण विभाग नांदेड व ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि विठ्ठल कत्ते, यांनी केले असुन, मपोकों राखी कसबे, पोलीस कल्याण, यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button