हेल्थ

संतोष अमिलकंठवार यांनी रक्तदान करून बालिके जीवदान दिले

 

नांदेड दि ३१ येथील एका रुग्णालयात ऍडमिट असलेल्या लहान बालीकेस ओ निगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ असलेल्या रक्ताची आवश्यकता होती नांदेड मधील सर्व ब्लड बँकेमध्ये चौकशी करून सुद्धा कोणत्याच बँकेमध्ये ओ निगेटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नव्हते यावेळी संतोष भाऊ यांना समजले की एका बालिकेस ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे आणि त्यांचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे त्यांनी स्वतःहून रुग्णालयात जाऊन ओ निगेटिव्ह रक्त दान केले व बालकेस जीवदान दिले

 

याबद्दल बालिकेच्या कुटुंबीयांनी त्यांचे मनस्वी आभार मानले योग्य वेळी बालिकेस रक्त मिळाल्याने बालिकेचा जीव वाचला त्यामुळे मालिकेच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता अशाच पद्धतीने नेहमी गरजवंत रुग्णांसाठी आपण रक्तदान करण्यासाठी तयार आहोत असे आश्वासनही संतोष अमिलकंठवार यांनी दिले त्यांनी केलेल्या या मानवतावादी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे समाजातील प्रत्येक नागरिकांनी याच पद्धतीने गरजवंत रुग्णास रक्तदान केले तर रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाणार नाही

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button