कर वसुलीसाठी महानगरपालिकेची सलग सातव्या दिवशीही धडक कारवाई सुरूच
नांदेड -महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शानाखाली उपायुक्त (महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रिय कार्यालयांना मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी मागील वर्षातील कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास नकार दिल्यास वसुली साठी कडक पावले उचला, वसुली चे नियोजन करावे, जप्ती ची कारवाई करावी अशा सक्त सुचना दिल्या आहेत.त्यानुसार क्षेत्रिय कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली आज दिनांक 31.05.2024 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजीराबाद अंतर्गत मालमत्ता क्र3-5-240,3-5-240/1या दोन मालमत्तेवर रु.394853/ थकबाकी व अनाधिकृत शास्ती सह कर थकीत असल्याने कर वसुलीसाठी सतत पाठपुरावा करूनही मालमत्ता धारक यशवंतराव देविदासराव भोरे यांनी कर भरणा करण्यास नकार दिल्याने संबंधित मालमत्ता धारकांचे चार दुकाने सिल करून जप्त करण्यात आली.
क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, पथकातील रमेश वाघमारे,अजहर आली, गिरीश काठीकर, नरेंद्र सिंग काटगर, अशोक ताटे यांनी सहभाग नोंदविला.
महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी मागील वर्षाचा थकीत कराचा भरणा त्वरित करून महापालिकेस सहकार्य करावे आणि जप्ती, मलनिःसारण, नळ खंडन यासारख्या सक्त कार्यवाही टाळाव्यात असे आवाहन उपायुक्त (महसूल)डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे.