क्राईम

हिंगोलीच्या पार्डीमोडमध्ये घरावर छापा टाकून 4.70 लाखाच्या आठ दुचाकी जप्त, एका जणावर गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील पार्डीमोड येेथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरावर छापा टाकून 4.70 लाख रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका तरुणा विरुध्द रविवारी ता. 28 दुपारी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर दुचाकी कोठून आणल्या याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पार्डीमोड येथे गजानन कामाजी पवार याच्या घरात काही दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम विठुबोने, जमादार संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, किशोर सावंत, भगवान आडे, गजानन पोकळे यांच्या पथकाने छापा टाकला.

यामध्ये घरात आठ दुचाकी आढळून आल्या असून यामध्ये सहा दुचाकी होंडा शाईन, एक होंडा पॅशन प्रो तर एक होंडा डिलक्स कंपनीच्या दुचाकीचा समावेश आहे. या दुचाकींची किंमत सुमारे 4.70 लाख रुपये एवढी आहे. पोलिसांनी सदर दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गजानन याच्याकडे या दुचाकी कोठून आणल्या, त्यांची कागदपत्रे कुठे आहेत याची विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

त्यामुळे आज सहाय्यक पोलिस निरीक्षक विठुबोने यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गजानन पवार याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आता दुचाकीच्या मालकांचा शोध सुरु केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button