मराठवाडा
निवळी खुर्द येथे अंगावर वीज कोसळून शेतकरी ठार; अन्य एकजण जखमी
परभणी/प्रतिनिधीतालुक्यातील निवळी खु.गाव शिवारातील शेतात मंगळवारी (दि.23) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्यासह विजांचा कडकडाटात अंगावर वीज कोसळून शेतकर्याचा मृत्यू झाला तर एक बैल ठार झाला.
शहरासह परिसरात मंगळवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यानंतर अवकाळी वारे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाने हजेरी लावली.
यात तालुक्यातील निवळी खु. येथील शिवारात शेतीत लक्ष्मण साहेबराव ठोंबरे हे लिंबाच्या झाडाखाली बांधलेले बैल सोडण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी गावातील नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉ.हनिफ खान यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, घटनेच्या वेळी एक बैल सुटून गेला तर दुसर्या बैलावर वीज कोसळली असता जागेवरच मृत्यू झाला. याच घटनेत बाजूला असलेले मुंजाभाऊ अंभोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. मात्र मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत घटनेची कोणतीही नोंद झाली नव्हती.