मराठवाडा

जिंतूरातील लॉजवर पोलिसांचा छापा; दोन जोडपे ताब्यात

परभणी/प्रतिनिधी,  शहरातील संभाजी नगर भागातील शिवनेरी लॉजवर सोमवारी (दि. 22) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. यावेळी लॉजच्या दोन खोल्यामध्ये जोडपी असल्याने पोलिसांनी दरवाजा वाजवताच एका जोडप्याने लॉजच्या रुम मधून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेच या जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरातील संभाजी नगर भागातील शिवनेरी लॉजवर आंबट शौकीन लोकांची दिवसभर वर्दळ राहत असे. मागील काही दिवसांपासून बाहेरून आलेल्या जोडप्याना लॉजवर रूम उपलब्ध करून त्यांच्याकडून तासाला भरमसाठ पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी होत्या. विशेष म्हणजे लॉजवर प्रवेश करताना कुठल्याही शासकीय नियमांचे पालन केले जात नाही. यामध्ये येणाऱ्या जोडप्याची राजिस्टरला नोंद नसणे, शाळकरी अल्पवयीन मुले-मुली या लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करत आहेत. यामुळे शहरातील  संभाजी नगर भागातील वातावरण दूषित होत आहे म्हणून पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवनेरी लॉजवर छापा मारला. यावेळी लॉजवर दोन रूममध्ये जोडपेआढळून आली मात्र यावेळी एका जोडप्याने लॉजच्या बाल्कनीतून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले.  तसेच लॉजवरील मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.
या कार्यवाहीतपोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक नीता कदम,पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण,भागवत कराड, सानप यांच्या पथकाने कार्यवाही केली. जिंतूर पोलिसांनी शिवनेरी लॉजवर मारलेल्या छाप्यात शहरातील तरुणी व महिला तर भोसी येथील तरुण व तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button