शहर

नांदेड शहर वाहतूक तर्फ जनतेला आव्हान

नांदेड शहराची वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण वाढलेली वाहनांची संख्या तसेच अरुंद रस्ते यामूळे वाहतूक कोंडीची समस्या दुपारी, सायंकाळचे वेळी जुना मोंढा ते वजिराबाद चौक कुसूमताई चौक- ITI, वर्कशॉप- राजकॉर्नर शेतकरी पुतळा मालेगाव रोड या मुख्य रोडवरती तसेच इतरही रोडवरती मुख्य करुन कलामंदीर, S. T. उड्डाणपुल परीसर, कुसूमताई चौक, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन इत्यादी ठिकाणी होत आहे. यासाठी सर्व वाहनचालकांनी, नागरीकांनी रोडवरुन वाहने चालवितांना दक्षता घेणे, वाहतूक नियमांकडे लक्ष देणे आवश्यक व गरजेचे आहे.
सर्व दोन चाकी, चार चाकी वाहने, ॲटो रिक्षा इत्यादी वाहनचालकाकडे आपली रोडवरुन, लेनवरूनच सुरक्षितपणे चालवणे आवश्यक आहे. डावा, उजवा, U टर्न घेताना दक्षता घ्यावी. रहदारीस अडथळा हाईल अशा रीतीने आपली वाहने रोडवरती थांबवू नयेत व उभी करु नयेत. पार्कींगचे जागेतच आपली वाहने लावणे आवश्यक आहेत. अॅटो रिक्षा चालकांनी आपले ताब्यातील अॅटोरिक्षा रोडवरती कोठेही अचानक थांबवू नयेत तसेच डावीकडे, उजवीकडे धोकादायकपणे वळवू नये. ड्रेस वरती राहावे, लायसन्स, परमीट इत्यादी कागदपत्रे जवळ ठेवावेत. नागरीकांशी सौजन्यांची वागणूक ठेवावी. तसेच कलामंदीर परिसरात, फुले मार्केट, श्रीनगर, इत्यादी गर्दीचे ठिकाणी दोन तिन लाईन मध्ये अॅटो रिक्षा थांबवू नयेत. शहर वाहतूक शाखेकडून शहर परवाना नंबर देण्याची योजना यापुढे सुरु करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व अॅटो रिक्षा चालकाने आपले अॅटोरिक्षाचे सर्व कागदपत्रे पूर्ण करुन घ्यावेत. सध्या ज्यांचे कागदपत्रे पुर्ण आहेत त्यांनी शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा येथे ? जुन पासून माहीती देवून परवाना नंबर घ्यावेत. ज्यांचे कागदपत्रे पुर्ण नाहीत त्यांनी २० जुन पर्यंत कागदपत्राची पुर्तता करुन परवाना नंबर प्राप्त करावेत.
सर्व मोटार सायकल चालकांनी आपले वाहनांचे कागदपत्र काढावेत, विना लायसन्स ड्रायव्हिंग करु नये, लायसन्स नसलेल्या इतर व्यक्तीस वाहने चालविण्यास देवू नयेत बदल केलेले मोटार सायकल वापरु नयेत. आपले मोटार सायकलला तसेच बुलेट मोटार सायकलला अनाधिकृत बदले केलेले सायलेन्सर (फटाका सारखे आवाज करणारे सायलॅन्सर) वापरु नयेत, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये, स्टन्डबाजी करु नये, रेसींग करु नये, ट्रिपल सिट वाहन चालवू नये. आपले मोटार सायकल रोडचे बाजुने व्यवस्थित पार्कंग करुन घ्यावेत.
फळे, भाजीपाला विक्री करणारे हातगाडेवाले, इतर किरकोळ साहीत्य विक्री करणारे, हॉकर्स यांनी आपले हातगाडे, स्टॉल रोडचे बाजूला सुरक्षित अंतरावर लावावेत. वाहतूकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रोडवरती लावू नयेत.
सर्व नागरीकांनीही एकेरी मार्ग वाहतूकीचे, सिग्नलचे पालन करावे. शहरामध्ये १. कलामंदीर समोर . बिकानेर बेकरी ते डॉ.लेन जाणारा, २. डॉ.लेन ते आयुर्विदीक कॉलेज जाणारा, ३. महात्मा गांधी पुतळा – चिखलवाडी कॉर्नर ते भगतसिंग कॉर्नर जाणारा, ४. जुना मोंढा ते देना बैंक गुरुद्वारा, महावीर चौक, सोनु कॉर्नर, वजिराबाद भाजी मंडई (तरोडेकर मार्केट), वजिराबाद चौक जाणारा असे ०४ वन वे रोड आहेत. सर्वांनी आपले लेनमधून वाहने चालवावित. प्रलंबित जुने दंडाची रक्कम त्वरीत भरुन घ्यावी, वाहतूक पोलीसांशी हुज्जत घालू नये, अॅम्बुलन्स ला त्वरीत रस्ता मोकळा करुन दयावा. आपली वाहने रोडचे बाजुला व्यवस्थितपणे लावावीत. वन वे रोडचे उल्लघंन करुन वाहने चालवू नयेत, सिग्नल कडे लक्षदयावे.
याप्रकारे सर्व नागरीकांनी आपली वाहने रोडवरुन वाहतूक नियमांकडे लक्ष देवून चालवावेत. वाहतूकीस अडथळा न होईल, वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवाहन शहर वाहतूक शाखा वजिराबाद कडून करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button