क्राईम
पो. स्टे. विमानतळ हद्यीत खुनाचा प्रयत्न करुन जबरी चोरी करणारा आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही
दिनांक 13/05/2023 रोजी सायंकाळी 9.00 वाजताचे सुमारास पोलीस ठाणे विमानतळ हद्दीत ॲटोतील प्रवाशास दोन अज्ञात इसमांनी खुनाचा प्रयत्न करुन जबरी चोरी केली होती. नमुद प्रकरणात ॲटोचालकाचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे विमातनळ गुरनं. 167/2023 कलम 307,397,341,34 भादवि सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 16/05/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा गुन्हयातील फिर्यादी (शेरु खुशालसिंह परमार ) व त्याचे दोन साथीदारांनी मिळुन केला असुन परमार हा महाराणा प्रतापचौकात थांबलेला आहे. माहीती मिळालेने वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने महाराणा प्रताप चौक नांदेड येथे जावुन सापळा रचुन इसम नामे 1) शेरु खुशालसिंह परमार वय 42 वर्ष व्यवसाय अॅटोचालक रा. सखोजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा त्यांनी व त्याचे दोन साथीदार नामे 2) सतिष ऊर्फ सत्या हनुमंत चव्हाण रा बालाजीनगर कृष्णा चौक नांदेड 3) आकाश ऊर्फ रितीक प्रकाश खिल्लारे रा तानाजीनगर नांदेड यांनी मिळुन केला असल्याचे सांगीतले आहे. मिळुन आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात वापरलेला एक ॲटो व एक मोबाईल असा एकुण 2,55,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पो. स्टे. विमानतळ येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, सपोउपनि / माधव केंद्रे, बालाजी तेलंग, पोकॉ/ तानाजी येळगे, मोतीराम पवार, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, महीला पो ना किरण बाबर, चालक गंगाधर घुगे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.