देश विदेश

‘सोनिया गांधी जेलमध्ये भेटायला आल्या होत्या’ काँग्रेसचा ‘किंगमेकर’ रडला,

मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने एक हाती सत्ता राखली आहे. या अभुतपूर्व विजयाचे शिल्पकार म्हणून डीके शिवकुमार यांना ओळखले जाते. आज पत्रकारांशी बोलत असताना सोनिया गांधी मला जेलमध्ये भेटायला आल्या होत्या, असं म्हणत शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.

कर्नाटकच्या विजयावर डीके शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विजयाचं श्रेय त्यांनी संपूर्ण त्यांनी कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना दिलं आहे.

मी आपल्या कार्यकर्ते आणि पक्षातील सर्व नेत्यांना या विजयाचं श्रेय देत आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत केली आणि काम केलं. आज लोकांनी खोट्याचा पर्दाफाश केला आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजय होणार असं आश्वासन दिलं होतं. मी हे विसरू शकत नाही, सोनिया गांधी या मला भेटायला जेलमध्ये आल्या होत्या, त्यावेळी मी पदावर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, असं म्हणत शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.

विशेष म्हणजे, फक्त एक दिवस प्रचार आणि 1 लाखांच्या फरकाने विजयी झालेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार सध्या चर्चेत आहे. सतत 8 वेळा आमदार झालेले डीके कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा वरिष्ठ नेता आणि कर्नाटकचे मंत्री आर. अशोक यांच्याविरोधात कनकपुरा येथून उभे राहिले होते. डीके शिवकुमार यांनी भाजपच्या नेत्याला तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने हरवलं आहे. त्यामुळे डीके पुन्हा एकदा जायंट किलर म्हणून समोर आले आहेत.

डीके शिवकुमार कर्नाटकमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कनकपूरा सीटमधून सातत्याने 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डीके शिवकुमार अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत. 2013 मध्ये ते जेडी (s) PGR सिधिंयांना हरवून 30,000 हून अधिक मतांनी निवडून आले होते. केवळ सिधिंयाच नाही तर शिवकुमार यांनी जद (s) सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच डी कुमारस्वानी यांना बंगळुरू ग्रामीणमधून हरवलं आहे. या यशानंतर त्यांना जायंट किलर नावाने ओळख मिळाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button