मराठवाडा

ह.अ.मौलवी जब्बार इर्फ़ानी यांच्या 58 व्या ऊर्स निमित्त विविध कार्यक्रम

वसमत (प्रतिंनिधि) :-
वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह ह.स.अ.मौलवी जब्बार इर्फ़ानी यांच्या 58 व्या ऊर्स निमित्त दि 14 ते 16 में 2023 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितिने दिली आहे 
महाराष्ट्रासह अन्य राज्यात प्रसिद्ध असलेल्या ह.अ.मौलवी जब्बार मो.मोहम्मदुल स.अलमारुफ़ मौलवी सय्यद इरफ़ान अलीशहा नबिरा बंदानवाज़ गेसुदराज़ (रह.) बसमत जि.हिंगोली यांचा 58 वा ऊर्स ह.अ.ख़लील सहाब क़िबला सज्जादा नशीन बारगाहे क़िबला (रह.) यांच्या मार्गदर्शनाखाली व हकीम उमरबिन अहेमद अलमारुफ़ फैजअलीशहा इर्फ़ानी संगारेडडी (तेलंगणा), यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे 
 दि 14 में 2023 रोजी सकाळी शासकीय रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम,सायंकाळी पारंपारिक पद्धतीने ऊर्स व संदल मिरवणुक शहरातील मुख्य मार्गाने निघुन परत दर्गाह ह.इर्फ़ानी येथे येऊन संदल चढ़विण्यात येणार आहे, 
दि 15 में रोजी दुपारी सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रशासकीय अधिका-यांना इर्फानी अवॉर्ड 2023 पुरस्कार वितरण,रात्री 8 वाजता दर्गाह परिसरात भोजनदान व महेफिले समा कार्यक्रम होणार आहे तर
 दि 16 मे रोजी पहाटे खत्मेकुरआन शरीफ, फातेहा व चादरगुल सह (तबरुख) महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे 
सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेल्या वसमत येथील ह.अ.मौलवी जब्बार इर्फ़ानी यांच्या ऊर्स निमित्त दरवर्षी तेलंगाना, हैद्राबाद, कर्णाटक, निझामाबाद , संगारेडडी, कामारेडडी, सह राज्यातील मुंबई, औरंगाबाद,नांदेड़,परभणी, हिंगोली,आदि ठिकाणाहुन भावीक मोठया संख्येने हाजेरी लावतात .
दरम्यान ऊर्स निमित्त दर्गाह व परिसरात रंगरोटी, रौशनाई,स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत ऊर्स कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा निवृत नायब तहसीलदार सय्यद महेमूद,अ.रज्जाक कुरेशी,संयोजन समितिचे अध्यक्ष मैनिद्दीन संदलजी,उपाध्यक्ष अब्दुल जलील,कोषाध्यक्ष महमद युसुफ,सचिव फेरोज पठान,सहसचिव सय्यद खदिर आदि सह समाज बांधव परिश्रम घेत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button