देश विदेश

एकनाथ शिंदेंचा डाव फसला, सुप्रीम कोर्टाने ‘शिवसेना’ घेतली हिसकावून, ठाकरेंचा पहिला विजय

दिल्ली, 11 मे : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकालाचे वाचन सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि ५ न्यायमूर्ती करत आहेत. यामध्ये सुरुवातीच्या निकालात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाने शिवसेनेवर केलेला दावा, प्रतोदपदी गोगावलेंची नियुक्ती यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.  शिवसेना पक्षातून फुटलेल्या आणि अपात्रतेच्या खटल्याला सामोरे जात असलेल्या आमदारांचा गट राजकीय पक्षावर दावा ठोकू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. यासह सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालायने म्हटलं की, राजकीय पक्षाने दिलेला व्हीप दहाव्या सूचीनुसार महत्त्वाचा. फूट पडली हे अध्यक्षांना 3 जुलै रोजी कळाले होते. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती. व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो.

कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. कारवाईपासून पळण्यासाठी हा दावा तकलादू. शिंदे गटाने कुठल्याही पत्रात पाठिंबा काढला असे सांगितले नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नाही. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती. अपात्रतेच्या कारवाईत मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

शिंदे गटाने भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. यामुळे शिंदे गटाला मोठा दणका बसला आहे. सुनिल प्रभू हे ठाकरे गटाचेच नेते प्रतोद म्हणून योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असून व्हीप न पाळणे म्हणजे पक्षाशी नाळ तोडण्यासारखे आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button