मराठवाडा

भरधाव कारच्या धडकेत दुचाकींवरील दोन युवक जागीच ठार परभणी-गंगाखेड महामार्गावरील दैठण्याजवळील दुर्घटना; अन्य चौघे जखमी

  
परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यातील निरनिराळ्या भागात अपघातांची मालिकाच सुरू असून परभणी ते गंगाखेड या महामार्गावर दैठण्याजवळ मंगळवारी (दि.9) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
          दैठणा येथील दीपक मारोतराव कच्छवे (वय 24), विवेक माणिकराव नाईक (वय 25), पवन कच्छवे व अन्य एक असे चौघेजण दुचाकी (क्रमांक एम.एच. 22 ए. वाय 3691) व दुचाकी (क्र.एम.एच.26 डी. 6802) या दोन वाहनांवर लग्नाच्या निमित्ताने निघाले होते. त्यावेळी कार (क्रमांक एम.एच. 14 सी.एक्स. 8340) या क्रमांकाच्या भरधाव कारने या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चौघे रस्त्यावर कोसळले. त्यात दीपक कच्छवे व विवेक नाईक या दोघांचा मृत्यू झाला. तर पवन कच्छवे यांच्यासह अन्य एकजण जखमी झाला. गंभीर जखमींपैकी एकास परभणीहून संभाजीनगरला हलविण्यात आले. दरम्यान, या दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जावून कोसळली.  या अपघातात मरण पावलेले दीपक कच्छवे, विवेक नाईक व जखमी पवन कच्छवे हे 3 युवक पोलीस भरतीची तयारी करीत होते.
          दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळीराम मुंडे, जमादार फड, मुळे, कुकडे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button