Uncategorized

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदी प्रा. डॉ. शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती

राज्य शासनाने परभणीतील घोषित केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव एप्रिल महिन्यात आलेल्या केंद्रीय समितीने रद्द केल्यानंतर आता राज्य सरकार ही ॲक्शन मोड मध्ये आला आहे. यापूर्वी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता पदाचा चार्ज नांदेड येथील डॉ. मोरे यांच्याकडे देण्यात आला होता. पण आता त्यांच्या जागी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 33 प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्याचे आदेशही वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहेत.

 

यामध्ये मराठवाड्यातील आंबेजोगाई, लातूर, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, पुणे, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश आहे. या प्राध्यापकांना आज 10 मे रोजी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे आता दुसऱ्या तपासणी तरी परभणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होईल अशी आशा परभणी करांमध्ये पल्लवीत झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button