स्पोर्ट्स

लिटिल स्कॉलर्स चा शिवतेज शिरफुले याला एशियन लॉन टेनिस स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

 

ITF एशिया अंडर 14 डेवलपमेंट स्पर्धेत लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल मंत्री नगर नांदेड शाळेचा विद्यार्थी शिवतेज बालाप्रसाद शिरफुले याची ओरिसा (भुवनेश्वर)येथे आय.टी.एफ.एशिया 14 वर्षाखालील स्पर्धेसाठी भारतीय लॉनटेनिस संघात कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती .
या स्पर्धेत 16 देशातील संघाने सहभाग नोंदविला होता . शिवतेज ने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारतासाठी रौप्य पदक पटकाविले.
ओरिसा चे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते शिवतेजला रौप्य पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले शिवतेज हा लॉनटेनिस रँकिंग मधे संपूर्ण भारतातून नंबर एक पोजिशनला असून .

त्याच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष रवींद्र रेड्डी सर माजी प्राचार्या रागिणी खालसा मॅडम, प्राचार्य केदार शर्मा सर, मुख्याध्यापिका उज्वला राणे , संगीता मदनुरकर,शिल्पा जामकर, क्रीडा शिक्षक रविकुमार बकवाड व शाळेतील शिक्षकवृंद आदिने अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवतेज शिरफुले यास क्रीडा शिक्षक रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button