क्राईम

शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या खात्यावर गंभीर आरोप, बुलडाण्यात खळबळ

बुलडाणा, 19 एप्रिल : मंत्रालयाच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. कारण, शिवसेनेचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे PS, OSD मागतात औषध विक्रेत्यांना प्रचंड पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेने केला आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पीए आणि ओएसडी औषध विक्रेत्यांकडे प्रचंड प्रमाणात पैसे मागत असल्याचा धक्कादायक आरोप महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून करण्यात आला आहे. तशा आरोपांचे पत्र या संघटनेच्या राज्यसचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

या ना त्या कारणाने औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाई संदर्भात निकाल देण्यासाठी बराच उशीर अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईवर निकाल देण्यासाठी आणि छोट्या छोट्या त्रुट्यासाठी औषध विक्रेत्यांकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पी एस. डॉ. विशाल राठोड त्याचबरोबर OSD संपत डावखर आणि चेतन करोडीदेव मोठ्या प्रमाणात औषध विक्रेत्यांकडे पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्रालयीन कार्यालय हे भ्रष्टालय झाल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

…म्हणून कारवाई केली संजय राठोड यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, औषध विक्रेता संघाने योग्य कारवाईला विरोध करू नये भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांच्या पाठीशी न राहता शासनास सहकार्य करावे सोमवार -मंगळवारी मंत्रालयात बैठकीस बोलणार अशा पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप करणे चुकीचे आहे, अधिकारी नियमाचे पालन करून कारवाई करतात क्षत्रिय अधिकाऱ्याने कारवाई केल्यानंतर त्यानंतर प्रकरण मंत्रालयात येतात खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची आहे, असं समजून मी स्टे दिल्यास आमच्या अधिकाऱ्याचं मनधैर्य खच्चीकरण होते म्हणून प्रत्येक प्रकरणात विचार करून मी निर्णय देत असतो मला या ठिकाणी संघटनेने सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

सुनावणी न घेता स्थगिती द्यावी अशी मागणी संघटना करते. कारवाई झालेली सात हजार दुकाने आहे. किराणा दुकानासारखी औषधी विकली जाते यावर सरकारचे नियंत्रण हवे. नशेची औषधे, सेक्सची औषध विकली जातात आणि पैसा कमवले जातो अशा तक्रारी आहे. अवर सचिव विवेक कांबळे यांचे ओरोफर या औषधांमुळे मृत्यू झाल्याचे देखील पुढे आले होते. अशावेळी संघटनेने सहकार्य करावे,अशाप्रकारे दबाव टाकू नये. अशा पद्धतीचे आरोप करुन दबाव टाकणे चुकीचे आहे. रद्द केलेल्या परवानावर निर्णय देवू नये अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. संघटनेनं शिफारस केलेल्या आणि कायद्यात बसणाऱ्या शंभर प्रकरणावर मी स्थगिती दिली आहे. औषध विक्रेते संघटनेने भ्रष्टाचारी विक्रेत्यांना पाठीशी घालू नये, असंही संजय राठोड यांनी बजावलं..

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button