देश विदेश

नांदेड येथून इरोड ला जाण्याकरिता विशेष गाडी च्या 22 फेऱ्या या गाडीने तिरुपती ला जाणे सोयीस्कर होणार

 

प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हजूर साहिब नांदेड ते इरोड (तामिळनाडू) दरम्यान विशेष गाडीच्या 22 फेऱ्या चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे :–

1. गाडी क्र. 07189 हजूर साहिब नांदेड ते इरोड विशेष गाडी (साप्ताहिक-शुक्रवारी) : हि गाडी हजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी दुपारी 14.20 वाजता सुटेल आणि मुदखेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा, काटपाडी, सालेम मार्गे इरोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल.
हि गाडी नांदेड येथून दिनांक 21 एप्रिल ते 30 जून, 2023 दरम्यान दर शुक्रवारी सुटेल. (11-फेऱ्या)

2. गाडी क्र. 07190 इरोड ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी (साप्ताहिक-रविवारी) : हि गाडी इरोड येथून दर रविवारी सकाळी 05.15 वाजता सुटेल आणि सालेम, काटपाडी, रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.
हि गाडी इरोड येथून दिनांक 23 एप्रिल ते 02 जुलै, 2023 दरम्यान दर रविवारी सुटेल. (11-फेऱ्या)

या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे 18 डब्बे असतील.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button