महाराष्ट्रा

अतिक अहमदच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगावात झळकले होर्डिंग; दोघांना अटक

बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (15 एप्रिल) रोजी समोर आली होती.  दरम्यान या घटनेचं काही ठिकाणांवरून समर्थन केलं जातंय, तर काही जणांनी याचा विरोध केलाय. दरम्यान महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटत असून, बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. तसेच बॅनरवर या दोघांचा शहीद म्हणून उल्लेख करण्यात आला होता. 

बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर दोघांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले आहे. मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मोहसीन पटेल याचा पोलीस शोध घेत आहेत.

अन् तात्काळ होर्डिंग काढले…

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आल्याने सद्या उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान यावरून आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहे. अशात बीडच्या माजलगावात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ होर्डिंग लागल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत संबधित होर्डिंग काढून घेतेले आहे. सोबतच गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button