देश विदेश

तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!..’, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अभिनेत्याचं वक्तव्य

मुंबई :आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे.

पोलिसांसमोर अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रयागराज याठिकाणी मेडिकल कॉलेजसमोर तीन हल्लेखोरांनी माजी खासदार अतीक अहमद आणि माजी आमदार अशरफ अहमद यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा पत्रकाद देखील घटनास्थळी उपस्थित होते. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या निधनानंतर अनेक प्रसिद्ध व्यक्ती प्रतिक्रिया देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी अहमद आणि अशरफ यांचं शवविच्छेदन होणार आहे. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.

 

अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. हा फक्त पाप, पुण्याचा खेळ असं नेटकरी म्हणत आहेत. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान ट्विट करत त्याचं मत व्यक्त करत आहे. देशात आमदार, खासदार सुरक्षित नसतील तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहत नाही… असं केआरके ट्विट करत म्हणाला.

केआरकेचं ट्विट करत म्हणाला, ‘अतिक अहमद जो पाच वेळा आमदार, एकदा खासदार राहिला आहे. तर त्याचा भाऊ अशरफ एक वेळा आमदार राहिला आहे. या लोकांची पोलिसांसमोर गोळी झाडून हत्या करण्यात आली. देशात जर आमदार, खासदार सुरक्षित नसतील तर, सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहत नाही…याच प्रकारे जर प्रत्येक गुन्हेगाराचा न्यायालयाबाहेर निर्णय होणार असेल तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!’ सध्या केआरकेचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोर प्रयागराज येथील राहणारे नसून, बाहेरील आहेत. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन बंदुका, काडतुसं, कॅमेरा आणि ओळखपत्रे सापडली आहेत. घटनास्थळावरुन मिळालेल्या वस्तूंची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. तिघांकडे असलेला कॅमेरा कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button