देश विदेश

भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री राहिलेले व विरोधी पक्षनेते असलेले जगदीश शेट्टर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

रविवारी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी निवडणूक नक्कीच लढवणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. सावेडी काँग्रेसमध्ये करणार आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.

तिकीट न मिळाल्याने नाराज

कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी भारतीय जनता पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले लोक राजीनामा देत आहेत. आता या यादीत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले. ते पक्षाचा राजीनामा देणार आहे.

कोण आहेत जगदीश शेट्टर

जगदीश शेट्टर हे लिंगायत नेते असून काँग्रेस सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. सहा वेळा आमदार राहिलेले जगदीश शेट्टर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. ते नाराज असल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेट्टर आपल्या भूमिकेवर ठाम होते. आपणास तिकीट नाकारल्यानचा परिणाम राज्यातील किमान 20 ते 25 जागांवर होईल, असा दावा त्यांनी केला.

येडियुरप्पा नाराज

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शेट्टर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही जगदीश शेट्टर यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवले. परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. कर्नाटकची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.

माझा अपमान झाला- शेट्टर

जगदीश शेट्टर म्हणाले की, भाजपमध्ये माझा अपमान झाला आहे. त्यामुळे मी निराश झालो आहे. माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे. मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

जन की बात आणि एशियानेट यांनी ओपनियन पोल जाहीर केला. त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष होणार आहे. या पक्षाला 98 ते 109 जागा मिळणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये बहुमतासाठी चांगला संघर्ष आहे. काँग्रेसला 89 ते 97 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button