क्राईम
सोशल मिडीया वापरणाऱ्या शाळा / कॉलेजच्या विद्यार्थ्यानी दुर राहाण्याचे आवाहन श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी केले आहे.
सर्व सोशल मिडीया वापरणाऱ्या / चालवणाऱ्या ग्रुप अॅडमिन यांना सुचना आहे की, आपल्या सोशल मिडीयाचे ग्रुपमध्ये कोणीही व्यक्ती खोटी /चुकीची माहिती, दिशाभुल करणारी माहीती. आक्षेपार्ह पोस्ट, आक्षेपार्ह मजकुर, जातीय सलोखा बिघडेल, दोन गटांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन पक्षामध्ये भांडण निर्माण करणारे, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारे, सार्वजनिक शांतता बिघडेल, धार्मीक भावना दुखावतील. अशा प्रकारचे मजकुर, करणारे मेसेज, पोस्ट, चित्रण, व्हिडीओ ग्रुपमध्ये प्रसारीत करणार नाहीत याची खबरदारी ग्रुप अॅडमीनने घ्यावी व अशा प्रकारचे मेसेज करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ ग्रुपमधुन काढुन टाकावे व त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड मोबाईल क्रमांक 9975629251 तसेच सायबर पोलीस स्टेशन नांदेड मोबाईल नंबर 8308274100 या व्हॉटसअॅप नंबरवर तात्काळ द्यावी.
जर ग्रुप अॅडमीनकडुन अशा प्रकारची माहिती वरील नंबरवर कळविली नसेल तर ग्रुप अॅडमीनवर सुध्दा सदरची पोस्ट प्रसारीत करण्यास मदत केली म्हणुन कायदेशिर कार्यवाही केली जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच जर कोणी व्यक्ती (Whats App, Facebook, Instagram, Twitter) इत्यादी सोशल मिडीयावर सोशल मीडियाच्या माध्यमातुन आक्षपार्ह आणि खोटया बातम्या पोस्ट/ शेअर / फॉरवर्ड / टिप्पणी केल्यास भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अशा व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांनी आक्षेपार्ह आणि खोटया पोस्ट/ शेअर / फॉरवर्ड / टिप्पणी केल्या संबधाने 46 लोकांचा शोध घेवुन त्याच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आडचणी निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. आपले करिअर घडवण्याकडे लक्ष द्यावे. आक्षेपार्ह पोस्ट संबंधाने गुन्हा दाखल झाल्यास आपले पोलीस चारीत्र पडताळीणी मध्ये अडचण निर्माण होवुन नौकरी व्यवसाय दरम्यान अडचणीला सामोरे जावे लागेल. अशा गोष्टी पासुन शाळा / कॉलेजच्या विद्यार्थ्यानी दुर राहाण्याचे आवाहन मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी केले आहे.