शहर

राजश्री शाहू महाराज ऑटो स्टॉप युनियन आसनाद्वारे भव्य खिचडी वाटप संपन्न

नांदेड दि.१४ सांगवी बु. परिसरातील आसना बायपास येथील राजर्षी शाहू महाराज ऑटो युनियनच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विमानतळ पोलिस स्थानक चे पोलीस निरीक्षक नरवाडे साहेब हे उपस्थित होते.त्यांनी भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांनी शोषित दलित समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले.असे प्रतिपादन केले यावेळी विचार मंचावर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम,मा.नगरसेवक प्रतिनिधी सदाशिव पुरी,माजी नगरसेविका नागाबाई कोकाटे,

 

 

निखिल नाईक,सरताजसिंग,सुरज सोनेकर,लियाकत शेख, संतोष भुक्‍तरे,अंकुश कोकाटे, श्रीराम कोकाटे,ज्ञानेश्वर जाधव,पत्रकार किरण कांबळे, संतोष साठे,गजभारे साहेब, गंगावरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑटो युनियनचे अध्यक्ष तुकाराम भुक्‍तरे,उपाध्यक्ष सुरज सरपाते,सचिव राजशेखर वायवळे, हंसराज हनुमंते, महेंद्र हटकर,प्रशांत चौधरी,सचिनमामा कुंभार, संजय लोकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button