क्राईम

चिथावणीखोर भाषा वापरणं कालीचरण महाराजांच्या अंगलट; नांदेडमध्ये काय घडलं?

नांदेड, 12 एप्रिल : आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे कालीचरण महाराज आता नव्या वादात सापडले आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे राम नवमी निमित्त आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी 9 एप्रिल रोजी बिलोली येथे राम नवमी निमित्त धर्मासभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले.

काय आहे प्रकरण?

धर्मसभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कालीचरण महाराज यांच्या विरोधात बीलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल भडकणे, विशिष्ट समजाच्या भावना दुखावने, दोन समजात तेढ निर्माण करने अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई केली आहे. कलम 153 अ, 295 अ आणि 505 – 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही वादग्रस्त विधाने

काही महिन्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात सापडले होते. हा वाद शमत असतानाच नाशिकमध्ये पुन्हा वाद होईल अशी भाषा कालीचरण महाराज यांनी वापरली. ‘मुसलमानांनी हिंदूंची 5 लाख प्रार्थनास्थळे फोडली. ती मिळवणे गरजेचं आहे. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. हिंदू मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये अडकला आहे. इस्लाम हा धर्मच नाही. धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म,’ असं कालीचरण यांनी म्हटलं होतं.

कोण आहे कालीचरण महाराज?

कालीचरण महाराजांचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. एका सर्वसामान्य कुटुंबातील कालीचरण आहेत. त्यांचे वडील धनंजय सराग यांचे औषधांचे दुकान आहे. कालीचरणचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

अभ्यासात फारसा रस नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना इंदोर येथे मावशीकडे पाठवले होते. याठिकाणी ते आश्रमात जात होते. काही वर्षांनंतर कालीचरण पुन्हा अकोल्यात परतले. पुढे कालीचरण महाराज म्हणून ओळख निर्माण केली. कालीचरण कालिका माताची आराधना करतात. ते शिवभक्त आहेत. तरुणांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. मध्यप्रदेशातील एका शिवमंदिरात कालीचरण महाराजांनी ‘शिवतांडव स्त्रोत’ अतिशय पहाडी आवाजात सुरेल पद्धतीने म्हटले होते. याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर एका रात्रीत कालीचरण महाराज देशभर पसरले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button