मराठवाडा

धनंजय मुंडेंसोबत एकत्र येण्याची चर्चा, पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर मोठी रेड

बीड, 13 एप्रिल : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी पथकाचा छापा पडला आहे. जीएसटी थकवल्यामुळे ही रेड पडल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून जीएसटीचे अधिकारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करत आहेत.  नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे.

एकाच व्यापपीठावर हजेरी

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंसोबत जवळीक वाढत आहे. दोघे बहिण भाऊ आज एकाच व्यासपिठावर येणार आहेत. बीडच्या मानूर गावात आज गहिनाथ गडाच्या 90 व्या फिरता नारळी सप्ताहाची सांगता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र येणार आहेत. मात्र दुसरीकडे आज पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून रेड टाकण्यात आली आहे.

भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला हजेरी 

दरम्यान  संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. एकाच आठवड्यात दोघे बहिण, भाऊ दोनदा एकाच व्यासपीठावर आल्यानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वाढत्या जवळीकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button