क्राईम

दंगल प्रकरणी शिवसेनेच्या माजी आमदार आणि 18 जणांना सक्तमजुरी आणि दंड नांदेड न्यायालयाचा दणका

 

नांदेड दि.११ एका आंदोलनात त्यावेळच्या शिवसेना आमदार अनुसया खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक एस. टी. बसचे नुकसान झाले होते, तसेच पोलीस ही जखमी झाले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या प्रकरणाचा आज निकालाची अंतिम सुनावणी केली त्यात माजी आमदार अनुसया खेडकर यांच्यासह एकूण 19 जणांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 1 लाख 60 हजार 750 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.यावेळी माजी आ.अनुसयाबाई प्रकाश खेडकर अनुपस्थित होत्या, म्हणून त्यांच्याविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. इतर 18 आरोपी न्यायालयात हजर होते.

लातूर एस.टी.आगाराची एस. टी. गाडी घेवून चालक हवगीराव शिवमुर्ती टिपराळे हे दि.7 जून 2008 रोजी सकाळी 6.45 वाजता नांदेडला पोहचले. त्यांच्या गाडीचा क्रमांक एम. एच. 20 डी. 8827 असा होता. त्यांची गाडी हिंगोली गेटच्या खुराणा ट्रॅव्हससमोर आली असता रस्त्यावर आंध्र प्रदेशची एस.टी.गाडी क्र.ए. पी. 28 झेड. 2316 यातील प्रवाशी खाली उतरून पळतांना त्यांना दिसले .यावेळी मी आणि माझ्या वाहकाने गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत शिवसेना कार्यकर्त्यां च्या जमावाने हातात दगड, काठ्या, लाठ्या, गजाळ्या घेवून बेकायदेशीर पणे सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. त्यावेळी हतगीराम टिपराळे यांनी दिलेल्या तक्रारीत एकूण 5 नावे होती आणि इतर 20 ते 22 शिवसैनिक असा उल्लेख होता. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 146/2008 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 341, 147, 148, 143, 149, 427 आणि 336 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार सिंगल है होते.

 

शहर विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा होते आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अविनाश सोनवणे होते. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक व्ही. एच सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला होता. त्या दिवशी एस. टी. गाडी क्रामंक एम.एच.20 डी.5917, एम.एच.20 डी.7348, एम.एच.20 डी.6812, एम.एच.40-9623, एम. एच. 40-8125, एम.एच.20 डी. 5173 तसेच महानगरपालिकेची चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. 26 बी. 445 तसेच पोलीस गाडी क्रमांक एम.एच.26 एल. 273 एवढ्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते. तसेच बऱ्याच पोलीस अंमलदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना दगडफेकीत मार लागून जखमी व्हावे लागले होते. या गुन्हयात पोलीस उपनिरिक्षक व्ही. एच. सूर्यवंशी यांनी तत्कालीन शिवसेनेच्या आमदार अनुसयाबाई प्रकाश खेडकर, त्यांचे पुत्र महेश प्रकाश खेडकर, दिलीप गोपालसिंह ठाकूर, नरहरी ठकाराम वाघ, बालाजी मुंजाजी शिंदे, भुजंग उत्तमराव कावळे, नवनाथ दत्ताबुवा भारती, बाळगिर खुशालगिर गिरी, दत्ता भुजाजी कोकाटे, दौलत निवृत्ती पोकळे, बाळू लक्ष्मणराव तिडके, शिवाजी टिकाराम सूर्यवंशी, श्रीकांत लक्ष्मीकांत पाठक, सुभाष विठ्ठलराव शिंदे, संदीप रामचंद्र चापनवार, व्यंकोबा बोलाराम राठोड, भुजंगराव विठ्ठलराव पाटील, भाया रामजी शर्मा, मनोज पुनमलाल यादव अशा एकूण 19 जणांविरुध्द दोषारोप पत्र दाखल केले.

 

 

यावर सत्र खटला क्रमांक 358/2019 प्रमाणे हा खटला जिल्हा न्यायालयात चालला. या खटल्यात अनेक जणांच्या साक्ष झाल्या. एका एस.टी. चालकाने उलट तपासणीमध्ये आपल्या जीवनातील एस. टी. चे कामकाज रडून रडून न्यायालयासमक्ष सांगितले होते…न्यायालयासमक्ष उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी या प्रकरणातील सर्वच्या सर्व 19 आरोपींना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायद्या कलम 3 प्रमाणे 5 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये रोख दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम 332 नुसार तीन वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 148 नुसार तीन वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड, तसेच कलम 353 नुसार दोन वर्ष सक्त मजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 341 नुसार एक महिना कैद आणि 500 रुपये रोख दंड, कलम 336 नुसार तीन महिने कैद आणि 250 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रीत भोगायच्या आहेत. प्रत्येक आरोपीचा एकूण दंड 1 लाख 50 हजार 750 रुपये होत आहे. या खटल्यात वजिराबादचे सध्याचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे यानी पैरवी अधिकाऱ्यांचे काम पाहिले. अशा प्रकारे सन 2008 मध्येच प्राथमिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर तो खटला 2019 मध्ये जिल्हा न्यायालयात वर्ग झाला आणि चार वर्षातच या प्रकरणाचा निकाल आला. घटनेच्या दिवसापासून या प्रकरणाचा निकाल यायला 15 वर्ष लागले आहेत.दि.7 जून 2008 रोजी दगडफेक झाल्यानंतर तत्कालीन आमदार अनुसया खेडकर, त्यांचे पुत्र महेश खेडकर यांना पोलीस ठाणे वजिराबाद येथे आणले असतांना तेथेही मोठा राडा झाला होता. त्यावेळी महेश खेडकर यांनी आपल्या आई आमदार अनुसयाबाई खेडकर यांच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला होता.

 

त्या खटल्यातून मात्र त्या सर्वांची मुक्तता झाली. त्यावेळी आमदाराला अटक करता येते की, नाही हा विषय सुध्दा जोरदारपणे पुढे आला होता. पण पोलीसांनी अत्यंत प्रभावीपणे आमदारांना अटक केल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली होती. पोलीसांची मेहनत या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरली आरोपीच्या वकीलांच्या विनंती अर्जामुळे दोनवेळेस निकालाची तारीख वाढवून देण्यात आली होती. परंतू आज यावरही खुप मोठी खर्चा झाली पण आज न्यायालयाने तारीख वाढवून दिली नाही आणि निर्णय जाहीर केला. निर्णय जाहीर करण्याअगोदर न्यायालयाने मागविलेल्या पोलीस बंदोबस्तातील आरसीपी पथक सकाळपासूनच न्यायालयात हजर होते. पुर्ण निकाल जाहीर होताच वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर. एस. मुत्येपोड, पोलीस अंमलदार सुधाकर आडे, रमेश सूर्यवंशी, भाऊसाहेब जाधव, सोनटक्के, डावरे यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांचे न्यायालयीन कामकाज करणारे पोलीस अंमलदार उपस्थित होते. शिक्षा झाल्यानंतर पोलीसांना भरपूर काम असतात आणि ते काम पुर्ण करण्यासाठी पोलीस मेहनत घेत होते माजी आ. अनुसूयाबाई खेडकर वगळता 18 आरोपीच्या नावे वैद्यकीय अधिकारी नांदेड यांना उद्देशून पोलीसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी होण्यासाठी तयारी केली आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन पुढील कारवाई करणार आहे नांदेड सत्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे दंगलखोर असलेल्या आरोपीमध्ये चांगलीच दहशत बसली आहे कायद्यापुढे गुन्हेगारांना माफी मिळत नाही गुना सिद्ध झाला तर आरोपी कितीही मोठा असला तरी न्यायालय त्यांना शिक्षा सुनावण्यामध्ये कोणतीच कसर सोडत नाही हेच या न्यायालयाच्या निकालावरून आपल्याला दिसून येते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button