क्राईम

असदवन शिवारात फायरींग करुन जबरी चोरी करणारे तीन आरोपी ताव्यात, 01 गावठी पिस्टल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही

पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्यीत असदवन शिवारात तंत्रनिकेतन विद्यालयाचे पाठीमागे दिनांक 03/04/2023 रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी एका प्रेमी युगलास पिस्टलचा धाक दाखवुन फायरींग करुन चांदीची चैन व नगदी 2000 रुपये जबरीने चोरुन नेले होते. वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 233/2023 कलम 307, 394, 397 भा द. वि. सह 3/25,3/27 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 11/04/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी ग्रामीण पॉलीटेकनिक कॉलेज ते वाघाळा, नांदेड जाणारे रोडलगतचे पाण्याचे टाकीखाली बसलेले आहेत वगैरे माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने ग्रामीण पॉलीटेकनिक कॉलेज ते वाघाळा, नांदेड जाणारे रोडलगतचे असदवन शिवारातील पाण्याचे टाकीखाली, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1) राजेंद्र अरुणसिंह ठाकुर वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी नांदेड 2 ) अतिष जिवनसिंह ठाकुर वय 22 वर्षे व्यवसाय बेकार रा. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी नांदेड 3) श्रीपाद ऊर्फ पियुष पि. सुधाकर कदम वय 19 वर्षे व्यवसाय बेकार रा. बहर्जीनगर, वसमत जि. हिंगोली ह. मु. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी नांदेड यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 233/2023 कलम 307, 394, 397 भाद. वि. सह 3/25, 3/27 शस्त्र अधिनियम हा गुन्हा केल्याचे सांगीतले आहे. आरोपी नामे राजेंद्र अरुणसिंह ठाकुर वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी नांदेड यांनी गुन्हा करताना वापरलेली गावठी पिस्टल किंमती 20,000/- रुपयाची जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतांना पो. स्टे. नांदेड ग्रामीण येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीताकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि /सचिन सोनवणे, जसवंतसिंघ शाहु, सपोउपनि / माधव केंद्रे, पोकॉ/ देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, चालक अर्जुन शिंदे व सायवरचे राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button