क्राईम

पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीतील हॉस्टेलवर दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांना अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

 

नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणनेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशी माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरनं 100/ 2023 कलम 395,506 भा.दं.वि. सह कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम या गुन्हयातील आरोपी हा अंकूश पंडीत व सोबतच्या साथीदारांनी केला असुन ते सद्या कांदे मामा हॉटेलच्या मागे एका रुममध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी छापा मारला असता सदर रुममध्ये चार इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता 1. अंकुश दिपक पंडीत, वय 23 वर्ष, व्यवसाय मजूरी रा. नेरली ता.जि. नांदेड, 2) सुरज पि. अर्जुन शिंदे, वय 22 वर्ष, व्यवसाय टि.व्ही. मेकॅनिक रा. कांदेमामा यांची बिल्डींग, तरोडानाका नांदेड, 3) सुरज महेंद्र हिंगोले, वय 22 वर्ष, व्यवसाय मजूरी रा. कासारखेडा ता. जि. नांदेड 4) निखील रमेश घोरपडे, वय 18 वर्ष, व्यवसाय शिक्षण रा. वसरणी ता.जि.नांदेड यांनी व त्यांचे साथीदार 5) अक्रांत अशोक खंडाखुळे, रा. नेरली ता. जि. नांदेड 6 ) गौतम सखाराम हटकर, रा. नेरली ता.जि.नांदेड 7) जसपालसिंघ दिवानसिंघ संधू, रा. गुरुव्दारा गेट नं.6, शहीदपुरा, नांदेड यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयात यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपीतांकडून एक लोखंडी खंजर, एक लोखंडी तलवार व गुन्हयात चोरलेला Vivo कंपनीचा मोबाईल 8000/- रुपये किमतीचा व नगदी 3000/- रुपये हस्तगत करण्यात आलेले आहेत. नमूद आरोपीतांना पुढील तपासकामी पो.स्टे. भाग्यनगर येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गोविंद मुंडे, पोउपनि जसवंतसिंघ शाहू, पोउपनि दत्तात्रय काळे, पोहेकॉ / सखाराम नवघरे, पोहेकॉ / रुपेश दासरवार, पोहेकॉ शंकर म्हैसनवाड, पोना / दिपक पवार, चापोहेकॉ / शंकर केंद्रे, चापोकों/गंगाधर घुगे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button