मनोरंजन

“ग्लोबल आडगाव” या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

नांदेडची भूमीकन्या डाॅ. संजीवनी दिपके सेकंड लीड भूमीकेत मोठया पडद्यावर
 
नांदेड,16- जन्मभूमी आणि कर्मभूमी नांदेड असलेल्या चरित्र अभिनेत्री डाॅ. संजीवनी दिपके यांनी या पूर्वी अनेक मराठी हिन्दी नाटकातून चरित्र अभिनयासाठी नॅशनल लेवल पर्य्ंत सूवर्ण पदके मिळवलीआहेत. नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. या चित्रपटातून सेकंड लिड भूमिका करून नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
     सिल्हर ओक फिल्म्स अॅन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत मनोज कदम निर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट “ग्लोबल आडगाव” ची निवड कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. दिनांक 15 ते 22 डिसेंबर दरम्यान संपन्न होणान्या महोत्सवात “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे प्रदर्शन 20 डिसेंबर रोजी नंदन प. बंगाल सेंटर, गर्दनमेंट ऑफ वेस्ट बंगाल, 1/1, जगदिशचंद्र बोस रोड, कोलकत्ता येथे प्रदर्शन होणार आहे.
 
   “ग्लोबल आडगाव या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिलकुमार साळवे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘शिरमी व 15 ऑगष्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातील लेखनाबद्दल अमेरिकेचा महाराष्ट्र फाउंडेशनचा रा. रा. दातार पुरस्कार मिळाला आहे, तर  15 ऑगष्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. 15 ऑगस्ट ला भारतातील सर्वांत प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही. शांताराम बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर अवार्ड, केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह 91 राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माती मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित ग्लोबल आडगाव हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला असून या चित्रपटाची निवड कोलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. कोलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येतो. येथे आजपर्यंत अमिताभ बच्चन, नसिरुदीन शहा, ऐस्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, नवाजोद्दीन सिद्दीकी, सुभाष घई यासह असंख्य महान कलाकार व चित्रपटकर्त्यांनी हजेरी लावलेली आहे.
 
     ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्यू पुणे व मुंबईत झाले. समिक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटात शेती मातीत राबनाच्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गाव जीवनाचं भव्य व उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा, म्हणी, नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मडवार, अनिकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. 
     ग्लोबल आडगाव म्हणजे शेती, मातीतल्या पिठ्यांची जिवर्धणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भौतींना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे. या कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 3 हजार चित्रपटातून 14 भारतीय चित्रपट निवडले गेले. त्यामध्ये महाराष्ट्रातून 
केवळ ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाची निवड झालेली आहे.
 
    या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कानगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषीकेष आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे, विष्णु चौधरी, रामनाथ कोकाटे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहे. इ.पी. प्रशांत जटार, प्रॉडक्शन मॅनेजर सागर देशमुख, छायांकन गिरिष जांभळीकर, संगीत विजय गवंड, साउंड विकास खंदारे, आर्ट संदिप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डिआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांचे असून डॉ. सिद्धार्थ तायडे, प्रदिपदादा सोळंके, दिलीप वाघ, गणेश डुकरे, वैदेही कदम, स्नेहल कदम, गणेश लोहार, मंगेश तुसे, संतोष गोरे, यशपाल गुमलाइ मधुकर कर्डक, प्रियंका सदावरते, प्राजक्ता खिस्ते, जगदिश गोल्हार, सुशील डायगव्हाणे, जितेंद्र सिरसाट, प्रशांत तालखेडकर, अनुराधा प्रकाश, राहुल कांबळे, अक्षय गायकवाड, मनिष खंदारे, सचिन गेवराईकर, स्वप्नील खरात, अमृता मोरे, मयंक सिरसाठ, केरे महाराज, आदित्य केरे, प्रतिक्षा गोरे, अरूण गाडे, अभिजीत काटे, भगवान राऊत, रूपेश पासफुल, ज्ञानेश्वर हरीबकर, डॉ. सतिश म्हस्के, प्रेरणा खरात, विद्या जोशी, रानवा गायकवाड, सागर पतंगे, व्यंकटेश कदम, अभ्वजीत कदम, नानासाहेब कडील, सोनल मंडे, सुधीर श्रीराम, स्वप्नील काळे, डॉ. उंडनगावकर, राजेश वाढोरे, योगेश लम्हणे,  सचिन कुलकर्णी, युवराज साळवे, सुदर्शनः कदम, अरविंद हमदापूरकर, फुलचंद नागटीळक, अमोल पानबुड़े, प्रकाश जावळे, प्रशांत जाधव, चैताली जाधव, अकांक्षा हमदापूरकर, साई महाशब्दे, आशिर्वाद नवगिरे यांच्या भूमीका आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button