क्राईम

तृतीयपंथीसोबत राहणं पडलं महागात; ‘तो’ हट्ट पुरवला नाही म्हणून तरुणाला आयुष्यातून उठवलं, हिंगोलीतील भयंकर घटना

हिंगोली, 1 एप्रिल, : हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तृतीयपंथीयाने तरुणाची हत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशोक गजानन आठवले असं मृत तरुणाचं नाव आहे.
अशोक त्याच्यासोबत लग्न करत नसल्यानं या तृतीयपंथी व्यक्तीनं त्याचा गळा आवळून खून केला. मृत अशोक गजानन आठवले हा हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील मूळ रहिवासी असून, हिंगोली शहरात काही महिन्यांपासून तो ऑटो चालवण्याचे काम करत होता. लग्न न करण्यावरून वाद घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीत एका तृतीयपंथीयाने सोबत राहणाऱ्या युवकाचा माझ्यासोबत लग्न का करत नाही? या कारणावरून गळा आवळून खून केला आहे.

शहरातील खुशाल नगर भागात ही घटना घडली आहे. अशोक गजानन आठवले असं मृत तरुणाचं नाव आहे. अशोक गजानन आठवले हा हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील मूळ रहिवासी असून, हिंगोली शहरात काही महिन्यांपासून तो ऑटो चालवण्याचे काम करत होता. हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात राहायला आल्यानंतर याच परिसरात राहणाऱ्या प्रिया उर्फ दिपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथीयाशी अशोकची ओळख झाली.

त्यानंतर अशोकने प्रिया उर्फ दिपककडेच राहायला सुरुवात केली.
गुन्हा दाखल यानंतर प्रिया उर्फ दीपक याने अशोककडे लग्न करण्यासाठी तगादा लावला, अशोकने लग्नास नकार दिला. त्यामुळे परवा 30 मार्च रोजी प्रिया उर्फ दीपक या तृतीयपंथीयाने शेख जावेद या आरोपीसोबत संगणमत करून अशोकचा गळा दाबून खून केला. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी अशोकने गळफास घेतल्याचा बनाव करत त्याला रुग्णालयात देखील दाखल केले. अशोकच्या नातेवाईकांनी तृतीयपंथी प्रिया व शेख जावेद या दोघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button