शहर

बुद्धविहार परिसरात श्याम पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून वृत्तपत्र वाचन कट्टा सुरू

 

नांदेड दि.२१सम्राट अशोक बौद्ध विहार सांगवी बु.येथे श्यामभाऊ कोकाटे यांच्या पुढाकारातून नविन वृत्तपत्र वाचन कट्टा सुरू करण्यात आला, या अगोदरही नांदेड शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष यांनी सांगवी वार्डामध्ये चार ठिकाणी वृत्तपत्र वाचन कट्टे सुरू केले आहेत नागरिकांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती जोपासली जावी हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी वार्डातील विविध भागांमध्ये वृत्तपत्र वाचन कट्टे सुरू केले आहेत या वाचनखट्ट्यांचा वापर करून अनेक नागरिक ज्ञान आणि माहितीचा संग्रह वाचून करत आहेत. श्याम पाटील कोकाटे हे नेहमीच वार्डामध्ये नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांना अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देत असतात.आज हा नवीन वाचन कट्टा सुरू करत असताना त्यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब भुक्‍तरे युवक काँग्रेस महासचिव सत्यवान पाटील अंभोरे,बाबाराव सावंत, संतोष भुक्तरे, विजय भुक्‍तरे, सदाशिव भुक्तरे, माधव भुक्‍तरे, संदीप भुक्‍तरे, भगवान सरपाते, भगवान इंगोले, बटलर भुक्‍तरे, सचिन सरपाते, रणजीत भुक्‍तरे आदी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button