प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान
नांदेड दि.२१कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे विद्यावाचस्पती(पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी मानव्यविद्या शाखे अंतर्गत लोकप्रशासन विषयात “तुरुंग प्रशासनाचा अभ्यास : विशेष संदर्भ मराठवाडा विभाग” या शीर्षकाखाली प्रा.डॉ.सुरेश गजभारे आणि प्रा.डॉ.विजय तरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले.अंतिम मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे हे होते तर पंच परीक्षक म्हणून प्रा.डाॅ.ज्योतिरादित्य भालेराव यांची उपस्थिती होती.त्यांनी मिळविलेल्या विद्यावाचस्पती पदवी बद्दल संस्थाध्यक्ष प्रा.मजहर सर,सचिव प्रा.आर्जूमंद बानो यास्मिन,प्राचार्य डाॅ.उस्मान गणी,डॉ.बाळासाहेब भिंगोले,डॉ.विजय पवार,डॉ.बिंबिसार वाघमारे,डाॅ.संजय झुंबाडे,डाॅ.पंजाब शिंदे,डॉ.संदीप काळे,डाॅ.सय्यद वाजिद,प्रा. अशोक आळणे,डाॅ.दिग्विजय देशमुख,प्रा.नजीर शेख,प्रा. अविनाश कोलते आदीनी अभिनंदन केले आहे.